मराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 5

सर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा.

Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name.

मागच्या तीन भागात आपण मायक्रोकंट्रोलरचे बेसिक, C लँग्वेजचे बेसिक, वेगवेगळया प्रकारचे ऑपरेटर्स आणि सर्व प्रायोगिक साहित्याची ओळख इत्यादी शिकलो.

आता या भागात आपण, मायक्रो कंट्रोलर आणि रोबोटिक्स प्रोग्रामिंग साठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर, आणि काही इतर साहित्याची ओळख करून घेऊ.

विद्यार्थी मित्रांनो, मला कल्पना आहे कि तुम्ही प्रत्यक्ष प्रोग्रामिंग कसे करायचे ते समजावून घेण्यासाठी आतुर झाले असाल. पण थोडा धीर धरा. आता लवकरच आपण मायक्रो कंट्रोलर आणि रोबोटिक्सच्या आश्चर्यकारक विश्वात प्रवेश करणार आहोत.

रोबोटिक्स शिकण्यासाठी कम्प्युटर कोणता असावा?

तुमच्या जवळ खालील प्रकारचा (minimum configuration) डेस्कटॉप कंप्युटर किंवा लॅपटॉप असणे आवश्यक आहे.

  1.  250GB Harddisk
  2. 2GB RAM
  3. Windows 7 किंवा त्यापेक्षा वरची operating system
  4. USB 2.5 किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्शनचे कमीतकमी दोन USB पोर्ट्स
  5. कीबोर्ड, माउस, इत्यादी…

मायक्रोकंट्रोलर आणि रोबोटिक्स प्रोग्रामिंग आपण TAB, iPhone किंवा Smart Phone वर करू शकत नाही हे लक्षात ठेवा. या कोर्सची मर्यादा विचारात घेऊन हे लिहिले आहे. त्यावर कृपा करून उगीच चर्चा करू नका.

सॉफ्टवेअरची माहिती

आपण या कोर्समध्ये ८०५१ मायक्रोकंट्रोलर वापरत आहोत. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले, WIN AVR नावाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करून ते आपल्या PC किंवा लॅपटॉपवर इन्स्टॉल करावयाचे आहे.

WIN AVR

WIN AVR सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
(File Size: 19.6 MB, Filename: WinAVR.exe)

क्लिक केल्यानंतर डाऊनलोडिंग चालू होण्यास ५-१० सेकंडचा वेळ लागेल. त्यानंतर सॉफ्टवेअर आपोआप डाउनलोड होण्यास सुरुवात होईल. डाऊनलोडिंग पूर्ण झाल्यावर WinAVR-20100110-install.exe या फाईलवर क्लिक करा. लगेच इंस्टॉलेशन प्रोसेस सुरु होईल.

खालील WIN AVR इंस्टॉलेशन गॅलरी मधील प्रत्येक फोटो ची माहिती वाचा.

यानंतर आपल्याला Keil uVision3 हे कम्पायलर डाउनलोड करावयाचे आहे. याचा उपयोग आपण मायक्रो कंट्रोलर आणि रोबोटिक्सचे प्रोग्राम लिहिण्यासाठी व त्यांना hex code मध्ये बदलण्यासाठी करणार आहोत.

Keil uVision3

Keil uVision3 हे कम्पायलर डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
(File Size: 25.9 MB, Filename: Keil uVision3.exe)

डाउनलोड झाल्यानंतर Keil uVision3 इन्स्टॉल करा. इन्स्टॉल करण्यासाठी Keil uVision3.exe या फाईल वर क्लिक करा.

इंस्टॉलेशन प्रोसेस मध्ये तुम्हाला खालील गोष्टी करावयाच्या आहेत. सोबतच्या गॅलरीतील प्रत्येक फोटो नीट पहा आणि त्याप्रमाणे इंस्टॉलेशन करा.

इन्स्टॉल झाल्यानंतर ते कसे वापरावे याचा व्हीडिओ खाली दिला आहे. सध्या हा व्हीडिओ इंग्लिश मध्ये  आहे. पण लवकरच मी मराठीतील व्हीडिओ पब्लिश करेल.

USBasp Drivers

USBasp प्रोग्रामर डिवाइस
USBasp प्रोग्रामर डिवाइस

आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला USBasp ड्रायव्हर्स इन्स्टॉल करावयाचे आहेत. त्याकरिता इथे क्लिक करा.
(Folder Size: 23.3 MB, Filename: InstallDrivers.exe)

माझ्या गूगल ड्राईव्ह ची हि लिंक आहे. लिंकवर क्लिक केल्यावर एक पेज ओपन होईल त्या पेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात Download All या बटनावर क्लिक करा. म्हणजे संपूर्ण फोल्डर झिप होऊन डाऊनलोडिंग सुरु होईल.

डाऊनलोडिंग झाल्यावर झिप फाईल अनझिप करा. आता तुम्हाला खालीलप्रमाणे फोल्डरमध्ये वेगवेगळ्या फाईल्स दिसतील.

त्यातील लाल बाणाने दर्शविलेल्या फाईलवर क्लिक करा म्हणजे इंस्टॉलेशन प्रोसेस चालू होईल. अधिक माहितीसाठी खालील स्क्रीनशॉट्स पहा.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आता आपण पूर्णपणे तयार आहोत. पुढील पाठात मी प्रोग्रामिंगचा भाग सुरु करणार आहे. तेंव्हा वरील सर्व सॉफ्टवेअर डाउनलोड करून आपला PC/लॅपटॉप तयार ठेवा.

If you liked this post please write Google feedback about us.
Thanks in advance!

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.