मराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 4

सर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा.

Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name.

मागच्या भागात आपण मायक्रोकंट्रोलरचे बेसिक, C लँग्वेजचे बेसिक, वेगवेगळया प्रकारचे ऑपरेटर्स आणि सर्व प्रायोगिक साहित्याची ओळख इत्यादी शिकलो. या भागात आपण आपल्याला लागणाऱ्या प्रायोगिक साहित्याची ओळख करून घेऊ.

हे साहित्य तुम्हाला पुढील प्रत्येक प्रयोगात/प्रोग्रामिंगसाठी लागेल. त्यामुळे प्रत्येक apparatus or firmware (साहित्य) ची माहिती नीट समजावून घ्या. मायक्रो कंट्रोलरसहित त्यातील सहयोगी साहित्याला हार्डवेअर (hardware) म्हणत नाही हे लक्षात ठेवा.

८०५१ डेव्हलपमेंट बोर्ड

८०५१ मायक्रोकंट्रोलर डेव्हलपमेंट बोर्ड
८०५१ मायक्रोकंट्रोलर डेव्हलपमेंट बोर्ड

वर दाखविलेला ८०५१ मायक्रो कंट्रोलर डेव्हलपमेंट बोर्ड नीट पहा.

आता खालील फोटोमध्ये PORT0 चा भाग दाखविलेला आहे. PORT0 ला ८ पिन्स आहेत आणि याला ८ पिन्सचे ३ मेल हेडर (कनेक्टिंग पिन्स) दिले आहेत त्यात Ground आणि +Vcc च्या प्रत्येकी ८ पिन्स दिसत आहेत.


या पोर्टला आपण साऊंड सेन्सर किंवा इन्फ्रारेड सेन्सर लावणार आहोत. खाली दाखविल्याप्रमाणे इन्फ्रारेड आणि साऊंड सेन्सरला ३ पिन्स असतात – आउटपुट पिन, ग्राउंड पिन आणि +Vcc पिन. या तीन पिन्स पैकी ग्राउंड पिन आणि +Vcc पिन या डेव्हलोपमेंट बोर्डवर ग्राउंड आणि +Vcc पिन्स ला लावायच्या आहेत आणि आउटपुट पिन हि PORT0 च्या कुठल्याही एक पिनला लावायची आहे.

जसे Black line following robot, white line following robot, वगैरे मध्ये आपण दोन इन्फ्रारेड सेन्सर्स वापरणार आहोत. त्यातील एका सेन्सरचे आउटपुट P0^0 ला आणि दुसऱ्या सेन्सरचे आउटपुट P0^7 असे कनेक्ट करायचे आहे.

याच प्रकारे आपण साऊंड सेन्सर सुद्धा P0^0 ते P0^7 यापैकी कुठेही लावू शकतो. त्याचा प्रोग्राम बनविताना आपण त्याची संपूर्ण माहिती पाहू.

पुढे PORT1 चे कनेक्शन्स नीट पहा. त्याचा क्लोजअप खाली दिला आहे. या पोर्टला ८ पिन्सचे मेल हेडर दिले आहे.

PORT1 चे कनेक्शन्स
PORT1 चे कनेक्शन्स

इथे PORT1 च्या ८ पिन्सला ८ LEDs जोडलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा (आपल्या प्रोग्राम प्रमाणे) PORT1 च्या कोणत्याही पिन वर बायनरी ‘1’ हा सिग्नल येईल, त्यावेळी विशिष्ट LED चालू होईल. जर सर्व पिन्स वर बायनरी ‘1’ हे आउटपुट असेल तर सर्व LEDs चालू होतील. अशा प्रकारे LEDs चालू/बंद करून डेकोरेटिव्ह इफेक्ट्स साठी आपण या LEDs चा उपयोग करणार आहोत.

पुढे PORT2 आणि PORT3 नीट पहा. त्याचा क्लोजअप खाली दिला आहे. या पोर्टला सुद्धा ८ पिन्सचे मेल हेडर दिले आहे. काही विशिष्ट कामासाठी आपण याचा उपयोग करू.

यानंतर मोटर कनेक्टरचा क्लोजअप खाली दिला आहे. L293D हि IC मोटर ड्राइवर म्हणून वापरली आहे. हि IC मायक्रो कंट्रोलर मधून सिग्नल घेऊन त्याप्रमाणे, रोबोटच्या डाव्या आणि उजव्या मोटर्सला कंट्रोल करते.

मोटर कनेक्टर
मोटर कनेक्टर

शेवटी बॅटरी कनेक्टर दिले आहे. रोबोटला DC पॉवर सप्लाय देण्यासाठी आपल्याला या सॉकेटला 6V/9V ची बॅटरी कनेक्ट करायची आहे. खालील फोटोत 5V Regulator IC 7805 दिसत आहे. हि IC मायक्रो कंट्रोलरला 5V चा सप्लाय देण्यासाठी वापरली आहे. सोबत on/off स्विच पण दिले आहे.

बॅटरी कनेक्टर
बॅटरी कनेक्टर

हा डेव्हलोपमेंट बोर्ड मल्टिटास्किंग बोर्ड असल्यामुळे, याशिवाय आणखी बऱ्याच इतर गोष्टी या डेव्हलोपमेंट बोर्डवर दिल्या आहेत. Ultrasonic सेन्सर, ब्लूटूथ सेन्सर, DTMF सेन्सर, इत्यादी सेन्सर्स सुद्धा आपल्याला या डेव्हलोपमेंट बोर्डसोबत वापरता येतात. पण त्याची सध्यातरी आपल्याला आवश्यकता नाही.

आता आपला थेअरीचा भाग संपला आहे. इथून पुढे प्रात्यक्षिकासाठी तयार राहा. आपल्याजवळ हा किंवा असा ८०५१ मायक्रो कंट्रोलरचा डेव्हलोपमेंट बोर्ड असणे आवश्यक आहे.

वर दाखविलेला बोर्ड आणि त्यासोबतचे सर्व साहित्य विद्यासागर अकॅडेमीत तयार केले आहे. हे संपूर्ण साहित्य आणि त्यासोबत पूर्ण नोट्स तुम्ही प्रात्यक्षिकांसाठी, आमच्या Distance Learning Course च्या अंतर्गत या लिंकवर ऑर्डर करू शकता.

पण जर अशा प्रकारचा दुसरा एखादा बोर्ड आणि इतर साहित्य तुमच्याजवळ असेल, तर त्यावर हि प्रात्यक्षिके करता येऊ शकतात. तेव्हा मित्रांनो, तयार राहा. लवकरच पाचवा भाग मी प्रकाशित करीत आहे.

avr
संपूर्ण फिटिंग केलेली किट अशी दिसेल (Click to enlarge)

If you liked this post please write Google feedback about us.
Thanks in advance!

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.