द्विलक्षी इलेक्ट्रोनिक्स अभ्यासक्रमाबाबत पुणे बोर्डाला एक नम्र सूचना


मी इतक्या वर्षांपासून पाहतोय की 11-12th HSC Bifocal Vocational Electronics चे syllabus २००० साली revise करण्यात आले त्याची online copy अजूनही बोर्डाच्या वेबसाईट वर उपलब्ध नाही.

आजही Google वर जर तुम्ही HSC bifocal vocational electronics syllabus टाईप केले तर माझ्या वेबसाईट ची लिंक हि पहिल्या नंबर वर येते.

विद्यार्थ्यांना संपूर्ण syllabus मोफत उपलब्ध व्हावे ह्या करिता मी माझ्या वेबसाईट वर २००१ साली ही सोय उपलब्ध करुन दिली. अतिशय काळजीपूर्वक मी ते syllabus type करून वेबसाईट वर FREE Downloading साठी उपलब्ध करून दिले आहे.

आणि मला सांगावयास अभिमान वाटतो कि आजपर्यंत १५००००० पेक्षा जास्त लोकांनी हे syllabus सम्पूर्ण जगात download केले. (म्हणजे अंदाजे २०००० downloads प्रत्येक वर्षी झाले) ह्या वरून syllabus ची किती आवश्यकता आहे हे दिसून येते.

माझ्या वेबसाईट वर download counter असल्यामुळे मला रोज कोणकोणत्या files चे किती downloads झाले ते दिसत असते.
ह्या वर बोर्डाने विचार जरूर विचार करावा अशी मी नम्र विनंती करतो….!

विद्यार्थी हे आपले पहिले उद्दिष्ट आहे आणि त्यांना मुलभूत सोयी उपलब्ध करून देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, हे आपण शिक्षकांनी विसरून चालणार नाही.

गुगल वर लिंक पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा…
https://www.google.co.in/search?q=12th+bifocal+electronics+syllabus&oq=12th+bifocal+electronics+syllabus

One thought on “द्विलक्षी इलेक्ट्रोनिक्स अभ्यासक्रमाबाबत पुणे बोर्डाला एक नम्र सूचना

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.