Bifocal vocational electronics: an important subject for your applied career

Why bifocal vocational electronics is important subject than any other vocational subjects?

व्होकेशनल इलेक्ट्रोनिक्स हा विषय, १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत, अतिशय महत्वाचा आहे आणि ह्या विषयाच्या मदतीने तुम्ही engineering college मध्ये खूप चांगले करिअर घडवून आपले भविष्य उज्वल बनवू शकता. कारण व्होकेशनल इलेक्ट्रोनिक्स हा अभ्यासक्रम engineering college मधल्या काही महत्वाच्या अभ्यासक्रमांचा पाया आहे.

12th Electronics Notes Complete Set

मित्रांनो, व्होकेशनल इलेक्ट्रोनिक्स फक्त प्रक्टिकलचे १०० मार्कस मिळवण्यासाठी आहे आणि मग थिएरीत जे काय मिळतील, त्या सगळ्यांची गोळाबेरीज करून engineering मध्ये admission घेण्यासाठी हा विषय आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला कोणी सांगत असेल, तर ते चुकीचे आहे, हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा!

बोर्डाने ह्या विषयाचे syllabus, २००० साली revise केले. Advanced and modern applied sciences च्या सखोल अभ्यासासाठी मदत व्हावी, ह्या दृष्टीने ह्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली. अतिशय विचारपूर्वक आणि दूरगामी परिणाम साधणारे असे ह्या विषयाचे syllabus आहे. शिवाय engineering college च्या काही विशिष्ट अभ्यासक्रमात, दुसऱ्या सत्रापासूनच ११वी आणि १२वी च्या इलेक्ट्रोनिक्सच्या syllabus चा अंतर्भाव केला होतो. मुख्यतः E&TC, Electrical, Computers, Instrumentation, Electronics, Power Electronics, Industrial Electronics, इत्यादी च्या अभ्यासक्रमात अगदी दुसऱ्या सत्रापासूनच ११वी आणि १२वी इलेक्ट्रोनिक्स अभ्यासक्रमाचा ८०% भाग अभ्यासात असतो*. त्यामुळे इलेक्ट्रोनिक्सचा विद्यार्थी ह्या संधीचा चांगला फायदा घेऊ शकतो. पण त्याने ११वी व १२वीत इलेक्ट्रोनिक्सचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.

Engineering college मध्ये अगदी दुसऱ्या सत्रापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरु होते. त्यात pcb, circuits, projects, seminars, robotic competitions, kits, job work, programming, microcontroller, remote controlling, Android OS, Simbian OS, simulation, अशी विविध शब्दावली विद्यार्थ्याच्या कानावर पडायला लागते. ह्या सगळ्याचा संबंध मग DMM, FG, CRO, power supply, regulators, opamps, integrator, differentiator, controller, comparator, sensors, modulation, QAM, FSK, gates, TTL, CMOS, Mux, Demux, registers, flip-flops, hex code, coding, encoder, decoder, LAN, A/D-D/A conversion, इत्यादी topics शी जोडलेला असतो.

मग विद्यार्थ्याला आठवते कि अरे, विद्यासागर सरांच्या notes मध्ये हे सर्व काही दिलेले आहे, पण तेंव्हा आपण अभ्यास केला नाही. ठीक आहे. आता करू….!!!

पण आता तयारी करण्यासाठी उशीर झालेला असतो, एका वर्षापूर्वी शिकवलेले topics आठवून तयारी करणे कठीण असते, कारण त्यावेळी, त्या topics चा नीट समजून अभ्यास केलेला नसतो. अगदी January महिन्याच्या शेवटी त्याला जाग आलेली असते. त्यामुळे सखोल वगैरे तर दूरच, अगदी दोन्ही paper मिळून २५-३० मार्क मिळाले तरी पुष्कळ झाले असे त्याने मनाशी ठरवलेले असते – त्याचबरोबर आपल्याला college मधून प्रक्टीकालचे ९५ च्या खाली तर मार्क मिळणारच नाहीत, हेही त्याला माहिती असते – पण इकडे अचानक engineering college च्या submission, seminar, competitions, वगैरे च्या dates येतात आणि मग विद्यार्थी गडबडून जातो.

मला असे बरेच विद्यार्थी भेटतात. आपल्या difficulties घेऊन माझ्याकडे येतात, कधीकधी फोनवरच विचारतात,

“सर, असा असा प्रॉब्लेम आहे, आता काय करू…?”
“कोणते पुस्तक refer करू…??”
“एकदम easy होईल असे सांगा सर….म्हणजे मला पटकन समजेल…”
“सर, तुमच्या notes पाहिजे…!”
“तुमच्या website वरून download करू का? लिंक देता का?”…वगैरे, वगैरे.

अशा विद्यार्थ्यांनाही मी योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, करतो आहे. पण अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना engineering college च्या ‘rat race’ मध्ये टिकणे कठीण होऊन जाते. काही प्रामाणिक विद्यार्थी cope-up करतात.

पण माझ्या व्यक्तिगत माहितीप्रमाणे साधारणतः ५% विद्यार्थी, अशा परिस्थितीत, engineering च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात DC होतात, घरी परत येतात आणि मग B.Sc. किंवा B.C.A. किंवा चक्क कॉमर्सला admission घेतात. पण हेही courses काही सोपे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा attitude, ११वी/१२वीतच बदलणे आवश्यक आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

परंतु जर विद्यार्थ्याने व्होकेशनल इलेक्ट्रोनिक्स विषयात प्रामाणिकपणे तयारी केली असेल तर त्याला ह्या सर्व (वर सांगितलेल्या) terminology ची माहिती असते, त्याची बेसिक तयारी झालेली असते आणि त्याचा उपयोग करून त्याला engineering चे syllabus सोपे वाटते, आपले करिअर engineering college च्या माध्यमातून तो तयार करू शकतो.

सेमिनार चांगल्याप्रकारे present करू शकतो, स्वतः प्रोजेक्ट बनवू शकतो, programming** वगैरे करू शकतो. ह्या सर्व activities मुळे (third year च्या) कॅम्पस इंटरव्यू मध्ये selection सोपे होते, चांगले job placement आणि package मिळते आणि परिणामी तो चांगले career तो घडवू शकतो.

अर्थातच ह्याकरिता त्याला ११वी-१२वी पासूनच व्होकेशनल इलेक्ट्रोनिक्स आणि modern technology ची सांगड घालून योग्य प्रशिक्षणही मिळावयास हवे आणि त्यातून त्याने ह्या संधीचा योग्य फायदाही घ्यायला हवा.

व्यक्तीशः १०वीच्या विद्यार्थ्यापासून अगदी थेट, engineering वगैरे आटोपून job करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांशी माझा contact आहे. B.E./M.E./MBA करून job करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मिळणारे feedback मी नेहमी ११/१२वी च्या विद्यार्थ्यांना सांगत असतो. नवीन technology, smart phones, internet इत्यादी मध्ये developments काय काय आहेत, ह्याची त्यांना माहिती देत असतो. माझ्या website वर त्याबद्दल updated articles लिहित असतो.

तात्पर्य असे कि, व्होकेशनल इलेक्ट्रोनिक्सच्या विद्यार्थ्याला हा विषय आणखी सोपा व्हावा, त्यामध्ये गोडी निर्माण व्हावी आणि त्याचा applied approach वाढीस लागावा, ह्याकरिता ही ‘व्होकेशनल इलेक्ट्रोनिक्स गाईड’ तयार केली आहे. ह्यात प्रक्टिकलच्या माध्यमातून थिएरी कशी शिकता येईल ह्यावर भर दिलेला आहे. माझ्या मते ह्यातून दोन गोष्टी साध्य होतील…

जे विद्यार्थी प्रक्टिकल करीत नाहीत, किंवा ज्यांना प्रक्टिकलच्या सुविधाच उपलब्ध नाहीत (असेही काही colleges आहेत), अशा विद्यार्थ्यांना प्रक्टिकलचे ज्ञान मिळेल.

आणि दुसरे म्हणजे प्रक्टिकल मधून थिएरीचे आकलन झाल्यानंतर विद्यार्थ्याला, थिएरीमधील कठीण topics सुद्धा सोपे वाटू लागतील आणि त्यातून त्याचा अभ्यासातील इंटरेस्ट वाढेल.

Please excuse me for English-Marathi mixed language. The subject under discussion is purely technical. So I couldn’t help it…!

How to start?

Since last four/five years students are becoming more and more reluctant about doing actual experiments of vocational electronics course. So in this booklet, I have tried to explain each and every experiment and its relation with the theory within the XI-XII syllabus, in simple language with interesting workouts.

To start with, the student needs to purchase a simple breadboard (as shown below) and actually do the experiments with given components. This helps to understand the internal connections of the circuit and its complete working. It is important to note that almost 80% of the theory part of vocational electronics can be completely understood by doing such experiments in actual practice. So in my view, vocational electronics is the subject which needs to understand the experiments rather than theory only. I will give following references to support my above views.

How experiments and topics are connected?

In following section we will see how number of topics of different chapters of both paper-1 and paper-2 are connected with the practical experiments.

Applied Electronics, Paper 1

In this paper, there are 6 chapters out of them, 5th chapter are connected with the practical part of XII electronics. Only the chapter of communication electronics, does not have any practical approach, though, as the experimental kits for the same would be very complicated and do not cover the scope and limitations of the syllabi.

For example, the chapter 1, Instruments covers CRO, FG and DMM. If student performs the experiments related to frequency, phase and amplitude measurements; measures AC/DC voltage and current using DMM; uses FG to connect different waveforms to CRO, then he will easily face any questions asked in theory examination for this chapter.

Then chapter 2, Power Supply, covers rectifier circuits (which are also included in XI) transistor regulators and 3-terminal voltage regulator IC circuit.

Chapter 3 covers the idea of speaker and thermister in amplifier and temperature controller experiments. Chapter 4 covers all the applications of opamp with the help of around eight circuits like inverting/non-inverting amplifier, adder, subtractor, integrator, differentiator and comparator. If student performs all these experiments, then there is no need to parrot the chapter. Chapter 6 covers applications of IC 555. Concept of on-off delay timer, periodic timer using astable and monostable multivibrator circuit can be understood using these experiments.

Digital Electronics, Paper 2

In this paper also, there are logic gates, mux, demux, encoder, decoder, flip-flop, counter, registers and AD/DA converters, which are included as experiments in the practical syllabus of HSC Board. So if a student performs all these experiments his/her ideas become so clear that there is very less efforts require to understand the theory.

You can refer to the detailed contents of 12th electronics at this link. We have complete set of 11th & 12th electronics study material. It contains everything for the self study of the student.

– Dattaraj Vidyasagar

* ह्या मुद्याची पुष्टी करण्यासाठी वेगवेगळ्या engineering colleges चे syllabus refer करा.

** Programming ची एक बेसिक आयडिया असावी, म्हणून १२वी परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत मी, व्होकेशनल इलेक्ट्रोनिक्सच्या विद्यार्थ्यांना ‘C’ language चा कोर्स करण्याचा सल्ला देतो. जे विद्यार्थी कोर्स करतात त्यांना पुढे DSP, embedded systems, php, Java, Oracle वगैरेसाठी ह्या बेसिक knowledge चा खूप उपयोग होतो. कंपनी जॉब्स मध्ये चांगला performance दाखऊन, त्यांची seniority वाढते.

# A breadboard (or proto-board) is usually a construction base for prototyping of electronics. The term “breadboard” is commonly used to refer to a solder less breadboard (plug board).


2 thoughts on “Bifocal vocational electronics: an important subject for your applied career

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.